
बीड, 5 डिसेंबर (हिं.स.)। मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त पाटोदा तालुका पत्रकार परिषदेतर्फे ग्रामीण रुग्णालय, पाटोदा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील विविध माध्यमांतील पत्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हृदयविकार तपासणी, रक्तदाब, साखर, हिमोग्लोबिन यांसह विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या.
ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिषेक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी तपासण्या करून आवश्यक सल्ला दिला. बदलती जीवनशैली, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबतही डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. पत्रकार आपल्या कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, अशा उपक्रमामुळे योग्य आरोग्य जागरूकता निर्माण होते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. खाडे, डॉ. तागड, डॉ. ओमासे, डॉ. सबिया, भागवत गर्जे, परिचारिका, चौले (बडे) आदी तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास मराठी पत्रकार परिषदेचे जेष्ठ पत्रकार छगन मुळे, जिल्हा उपाध्यक्ष कादर मकराणी, इद्रीस चाऊस, दयानंद सोनवणे, श्रीरंग लांडगे, सचिन पवार, डिगंबर नाईकनवरे, तालुकाध्यक्ष अजय जोशी, सचिव हमीदखान पठाण, हल्ला कृती समितीचे तालुकाध्यक्ष संजय सानप, उपाध्यक्ष अशोक भवर, जावेद शेख, अनिल गायकवाड, शहराध्यक्ष सय्यद फय्याज, सलीम शेख, पवन भोकरे, सय्यद इम्रान, डिजिटल मीडिया उपाध्यक्ष डॉ. हरिदास शेलार, दत्ता देशमाने यांसह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते. उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे पुढील काळात अशा उपयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis