हिंजवडी समस्यांवर ''फास्टट्रॅक लेबर कोर्ट, लिफ्ट सुरक्षा
पुणे, 5 डिसेंबर (हिं.स.)। राज्याच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील विविध कंपन्यांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातून करणार आहे. याशिवाय पवना नदी सुधार प्रकल्प
हिंजवडी समस्यांवर ''फास्टट्रॅक लेबर कोर्ट, लिफ्ट सुरक्षा


पुणे, 5 डिसेंबर (हिं.स.)।

राज्याच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील विविध कंपन्यांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातून करणार आहे. याशिवाय पवना नदी सुधार प्रकल्प, अप्रशिक्षित वाहन चालकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सक्षम प्रशिक्षण प्रणाली उभारणे, उद्योग नगरीतील अघोषित भार नियमांवर उपाययोजना करणे, हिंजवडीमधील आयटीयन्सच्या विविध समस्यांवर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी फास्टट्रॅक लेबर कोर्ट प्रणाली विकसित करणे तसेच हिंजवडीतील विविध समस्यांवर ''फास्टट्रॅक लेबर कोर्ट स्थापन करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. याशिवाय पिंपरी चिंचवड शहरासह राज्यातील 48 प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्य म्हणजे विविध लक्षवेधींच्या माध्यमातून महत्वाच्या प्रश्नांवर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे जोरदार मागणी करणार असल्याचेही आमदार जगताप यांनी सांगितले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande