जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट
जळगाव, 5 डिसेंबर (हिं.स.) राज्यातील विविध व्यापारी संघटनांनी ऑनलाइन परवाना पद्धती आणि अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील व दाणा बाजारातील सर्व व्यापाऱ्यांनी सहभाग नोंद
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट


जळगाव, 5 डिसेंबर (हिं.स.) राज्यातील विविध व्यापारी संघटनांनी ऑनलाइन परवाना पद्धती आणि अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील व दाणा बाजारातील सर्व व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवत आज, शुक्रवारी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले. परिणामी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक धान्य आणि दाणा बाजार परिसरातील १७० हून अधिक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आणि सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. यामध्ये जळगाव शहरातील शेकडो व्यापारी सहभागी झाले. ज्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. या बंदमुळे राज्यभरातून जळगाव बाजार समितीत येणारा शेतमाल येऊ शकला नाही, तसेच बाजार समितीतून बाहेरील जिल्ह्यांमध्ये जाणारा माल देखील जागेवरच थांबला. परिणामी, शेतमाल वाहतूक आणि खरेदी-विक्रीची संपूर्ण साखळी खंडित झाली.व्यापाऱ्यांच्या या एकजुटीमुळे सरकारने त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बाजार समितीचे कामकाज ठप्प झाल्याने शेतकरी आणि ग्राहकांनाही काही प्रमाणात फटका बसला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande