
नांदेड, 5 डिसेंबर (हिं.स.)।
किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शासकीय हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन युवा नेते अॅड. प्रतीक केराम यांच्या हस्ते आज उत्साहात पार पडले. केंद्र सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून हमीभावाने खरेदी सुरू झाल्यामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी बोलताना केराम म्हणाले की, शेतकरी हा आपल्या अन्नपुरवठा व्यवस्थेचा कणा आहे. त्यांची मेहनत आणि घामाचे दाणेच आपले जगणे सुरक्षित ठेवतात. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणे ही शासनाची आणि समाजाची सामाईक जबाबदारी आहे. शासनाच्या हमीभावाने सुरू होणाऱ्या या सोयाबीन खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना दर घसरण्याची भीती राहणार नाही. सोयाबीनचे उत्पादन विकताना कोणत्याही दलालांची लूट किंवा अन्याय होऊ नये
कार्यक्रमास प्रमुख उपस्थित सभापती गजानन मुंढे पाटील, उपसभापती राहुल नाईक, माजी नगराध्यक्ष आंनद मच्छेवार तर संचालक मंडळातील श्रीराम कांदे, बालाजी बामणे, प्रेमसिंग जाधव, सरू भाई, प्रल्हाद सातव, संजय मुंढे, प्रमेसिंग साबळे, दत्ता आडे, राजू बोप्पलवार, शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis