आमदार सुरेश धस यांची भाजपा बीड जिल्हा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती
बीड, 5 डिसेंबर (हिं.स.)। स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्हा निवडणूक प्रमुखपदी आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या संघटन कौशल्याचा
आमदार सुरेश धस यांची भाजपा बीड जिल्हा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती


बीड, 5 डिसेंबर (हिं.स.)। स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्हा निवडणूक प्रमुखपदी आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या संघटन कौशल्याचा व व्यापक जनसंपर्काचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ही जबाबदारी सोपवली आहे. राजकारणात स्पष्टवक्तेपणा, अभ्यासू दृष्टी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर थेट व ठाम भूमिका घेणारे नेते म्हणून आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांची ओळख आहे. पक्षाच्या संघटन बळकटीसाठी तसेच निवडणुकीचे नियोजन, प्रचार धोरण आणि समन्वय

यासाठी धस यांच्या अनुभवाचा लाभ पक्षाला होणार आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर का मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी यापूर्वी विविध निवडणुकांमध्ये पक्षासाठी प्रभावी कामगिरी केली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील भाजप कार्यकत्यांमध्ये नवचैतन्य होईल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande