
६ डिसेंबर रोजी ७०० तज्ज्ञ होणार सहभागी
छत्रपती संभाजीनगर, 5 डिसेंबर (हिं.स.)।
रक्तवाहिनी विज्ञान, ऑन्कोलॉजी, एंडोव्हॅस्क्युलर उपचार आणि अल्ट्रासाउंड तंत्रातील नव्या प्रवाहांवर एंडोव्हॅस्क्युलर परिषद होणार आहे. एमजीएम मेडिकल कॉलेजमध्ये ६ डिसेंबरपासून परिषद सुरु होणार आहे. या परिषदेत ७०० तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. यामध्ये तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या एकत्रीकरणातून भविष्यातील उपचार पद्धतींचा वेध या एकदिवसाच्या परिषदेतून घेतला जाणार आहे.
सांधेदुखी, रक्तवाहिन्या आणि फुप्फुसातील रक्तगाठी यांच्या उपचारावर या परिषदेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती परिषदेच्या संयोजन समितीचे सचिव डॉ. शिवाजी पोले यांनी दिली.
इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभाग, एमजीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय पातळीवरील तीन तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. पायातील रक्तवाहिन्यावरील एंडोव्हॅस्क्युलर उपचारांवर केइएम मुंबई रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. एआयजी इन्स्टिट्यूट हैदराबादचे डॉ. जगदीश सिंग कॅन्सरवरील एंडोव्हॅस्क्युलर उपचारांवर पॅनेल चर्चेत सहभागी होणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis