जळगाव : मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव
जळगाव, 5 डिसेंबर, (हिं.स.) - जळगाव महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नुकत्याच प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या असून, या याद्यांमधील गंभीर त्रुटींमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तब्बल १६ हजार नागरिकांची नावे दोन किंवा दोनपेक्षा अध
जळगाव : मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव


जळगाव, 5 डिसेंबर, (हिं.स.) - जळगाव महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नुकत्याच प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या असून, या याद्यांमधील गंभीर त्रुटींमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तब्बल १६ हजार नागरिकांची नावे दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेळा दिसून येत आहेत, तर एका व्यक्तीचे नाव थेट १७ वेळा आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निकट भविष्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी जळगाव शहरातील १९ प्रभागांची प्रारूप मतदार यादी मनपाने जाहीर केली आहे. या याद्यांवर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या असून त्या प्रभागनिहाय पथकांकडून तपासल्या जात आहेत.

मनपाच्या आकडेवारीनुसार, प्रारूप यादीत ३३ हजारांहून अधिक दुबार नावे असून त्यात १६ हजारांपेक्षा जास्त मतदारांची नावे पुनरावृत्ती, तिहेरी किंवा त्याहून अधिक वेळा दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या डेटा पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.जळगाव शहरात एकूण ४,३८,५२३ मतदारांची नोंद आहे. पुरुष मतदार : २,२५,३०८ महिला मतदार : २,१३,१७७ इतर (थर्ड जेंडर) : ३८ दि. १ जुलै २०२५ पर्यंत नोंदणी झालेल्या सर्व मतदारांना आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदार याद्यांतील या मोठ्या त्रुट्यांमुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande