पुणे महापालिकेच्या रणसंग्रामाची सुरुवात, मुहूर्तावर उबाठाकडून इच्छुकांना देण्यास सुरुवात
पुणे, 5 डिसेंबर (हिं.स.)। आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पुणे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुकांना उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात केली आहे. आज दोन महिला आणि दोन पुरुष या इच्छुकांना उमेदवारी अर्ज देऊन निवडणुकीचे रंणश
पुणे महापालिकेच्या रणसंग्रामाची सुरुवात, मुहूर्तावर उबाठाकडून इच्छुकांना देण्यास सुरुवात


पुणे, 5 डिसेंबर (हिं.स.)।

आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पुणे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुकांना उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात केली आहे. आज दोन महिला आणि दोन पुरुष या इच्छुकांना उमेदवारी अर्ज देऊन निवडणुकीचे रंणशिंग फुंकले.यावेळी निवडणूक समन्वयक वसंत मोरे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत उपस्थित होते.शिवसेनेने गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकरांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा दिला आहे. भ्रष्टाचार, अनियमित कारभार, सत्ताधाऱ्यांची जनविरोधी भूमिका याविरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठविला.दरम्यान, महापालिका निवडणुका जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शहरातील प्रत्येक प्रभागात मोठ्या संख्येने इच्छुक पुढे येत आहे.या इच्छुकांना पुढील सात दिवसांत अर्ज दिले जाणार असून, त्यामध्ये उमेदवाराचे शिक्षण, सामाजिक काम, शैक्षणिक योगदान, पक्षाच्या आंदोलनातील सहभाग, बैठकीतील उपस्थिती, प्रभागातील उपक्रम अशी सविस्तर माहिती भरून घेण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व इच्छुकांच्या मुलाखती होतील, अशी माहिती संजय मोरे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande