
डोंबिवली, 5 डिसेंबर, (हिं.स.)। मोठागाव डोंबिवली पश्चिम खाडी किनारी सातपुल परिसरात 107 तितर पक्षी मृत अवस्थेत आढळून आले असून याची माहिती मिळताच कल्याण वनविभागचे अधिकारी स्पॉटवर पोचले आणि पंचनामा करून सदर मृत पक्षी पोस्ट मार्टमसाठी नेण्यात आले. पुढील तपास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi