पुण्यातील आजी-माजी आमदारांचे भवितव्य पणाला
पुणे, 5 डिसेंबर (हिं.स.)। नगरपालिकेची निवडणूक शांततेत पार पडली. संपूर्ण प्रचारकाळात आरोप-प्रत्यारोपांची मालिका झडत राहिली. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या वतीने दुर्गादेवी जगदाळे, भाजपा पुरस्कृत नागरिक हित संरक्षण मंडळाकड
पुण्यातील आजी-माजी आमदारांचे भवितव्य पणाला


पुणे, 5 डिसेंबर (हिं.स.)। नगरपालिकेची निवडणूक शांततेत पार पडली. संपूर्ण प्रचारकाळात आरोप-प्रत्यारोपांची मालिका झडत राहिली. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या वतीने दुर्गादेवी जगदाळे, भाजपा पुरस्कृत नागरिक हित संरक्षण मंडळाकडून मोनाली वीर, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने कोमल बंड हे प्रमुख उमेदवार होते. सर्व उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले असून, निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. ही निवडणूक स्थानिक असली तरी यामध्ये आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

या निवडणुकीवर आमदार राहुल कुल, नागरिक हित सरंक्षण मंडळाचे प्रेमसुख कटारिया, माजी आमदार रमेश थोरात व दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे यांच्या राजकीय प्रभावाची छाप दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी 25 जागांवर उमेदवार दिले. नागरिक हित संरक्षण मंडळाने सर्व जागांवर उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष फक्त 18 जागांवर उमेदवार उभे करू शकले. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून एका जागेवर उमेदवारी देण्यात आली, तर आम आदमी पक्षाने येथे नगरसेवक पदासाठी 7 जणांना उमेदवारी दिली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande