हरकतींचे काम पुढील सहा दिवसांच्या आत करावे लागणार पूर्ण निवडणूक आयोगाने घेतला महापालिका निवडणुकीचा आढावा
नाशिक, 5 डिसेंबर (हिं.स.)। :- नाशिक महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींचा पाऊस बघता, त्याचे निराकरण करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी काही महापालिकांच्या वतीने काल निवडणूक आयोगाकडे केली. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार हे काम वेळे
हरकतींचे काम पुढील सहा दिवसांच्या आत करावे लागणार पूर्ण निवडणूक आयोगाने घेतला महापालिका निवडणुकीचा आढावा


नाशिक, 5 डिसेंबर (हिं.स.)।

:- नाशिक महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींचा पाऊस बघता, त्याचे निराकरण करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी काही महापालिकांच्या वतीने काल निवडणूक आयोगाकडे केली. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार हे काम वेळेतच पूर्ण करावे लागणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. तसेच मागणीवर विचार करू, असे सांगितले. दुबार नावे सिध्द झाल्यास अशी नावे वगळण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत.राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. नाशिक महापालिकेची यादी २० नोव्हेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यावर सुमारे ९ हजार ८२७ हरकती प्राप्त झाल्या आहेत. काल राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या बैठकीत या संदर्भातील आढावा सादर करण्यात आला. नाशिक

महानगरपालिकेने आत्तापर्यंत ५,२०० तक्रारींची तपासणी केली आहे. तसा अहवाल या बैठकीत आयोगाला उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी सादर केला. हरक तींचे निराकरण करण्यासाठी तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्यासाठी ३१ विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभागांत प्रत्यक्ष भेटी देत दस्तऐवजांची पडताळणी, मतदारांकडून माहिती संकलन आणि नकाशे व यादीतील तफावतदूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश टी. वाघमारे यांनी नाशिकसह राज्यातील विविध महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांची सुमारे तीन तासांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सविस्तर आढावा बैठक घेतली. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त व प्रशासक करिष्मा नायर, प्रशासन उपायुक्त साताळकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande