परभणी - जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान
परभणी, 5 डिसेंबर, (हिं.स.)। परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 138 थँलेसिमिया ग्रस्त बालके असून त्यांना दर पंधरा दिवसाला आयुष्यमान वाढवण्यासाठी रक्ताची गरज भासते, त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त व्यक्ती व गरोदर माता यांनाही रक्ताची आवश्यकता असते ही
जिल्हा परिषदेत अधिकारी - कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान सीईओ नतिशा माथुर यांची संकल्पना आणि पुढाकार


परभणी, 5 डिसेंबर, (हिं.स.)। परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 138 थँलेसिमिया ग्रस्त बालके असून त्यांना दर पंधरा दिवसाला आयुष्यमान वाढवण्यासाठी रक्ताची गरज भासते, त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त व्यक्ती व गरोदर माता यांनाही रक्ताची आवश्यकता असते ही गरज लक्षात घेऊन परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले.

शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास 29 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने व स्वयं स्फूर्तीने रक्तदान केले. यावेळी स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

यावेळी राज्य समन्वयक थँलेसिमियामुक्त महाराष्ट्र लक्ष्मीकांत पिंपळगावकर, समाज कल्याण अधिकारी सरस्वती भोजने, स्वीय सहाय्यक युवराज देशमुख, कनिष्ठ प्रशासन गजानन लोंढे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनोज कन्नावार, श्री आठवले यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

थँलेसिमियाग्रस्त बालकांना येणाऱ्या काळात रक्ताचा पुरवठा कमी पडू नये म्हणून रक्तदान शिबिराचे नियोजन तालुकास्तरावर करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande