पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कुष्ठरोग शोध मोहीम’ यशस्वीरीत्या संपन्न
पुणे, 5 डिसेंबर (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे ''कुष्ठरोग शोध मोहिम'' प्रभावीपणे राबविण्यात आली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या अधिपथ्याखाली पार पडलेल्या या संपूर्ण मोहिमेचा उद्देश शहरातील नागरिक
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कुष्ठरोग शोध मोहीम’ यशस्वीरीत्या संपन्न


पुणे, 5 डिसेंबर (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे 'कुष्ठरोग शोध मोहिम' प्रभावीपणे राबविण्यात आली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या अधिपथ्याखाली पार पडलेल्या या संपूर्ण मोहिमेचा उद्देश शहरातील नागरिकांमध्ये कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे, रुग्णांचे निदान करणे तसेच वेळेवर उपचार उपलब्ध करून देणे हा होता.

वैद्यकीय विभागाच्या पथकामार्फत संपूर्ण शहरातील विविध वसाहती, झोपडपट्ट्या, घनदाट लोकवस्ती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल क्षेत्रे तसेच संवेदनशील भागांमध्ये गृहभेटीद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात आली. मोहिमेदरम्यान पथकाने त्वचेवरील डाग, संवेदना कमी होणे, मुंग्या येणे, सूज, किंवा कुष्ठरोगाची कोणतीही संभाव्य लक्षणे असलेल्या नागरिकांचे बारकाईने परीक्षण केले. संशयित रुग्णांना तत्काळ प्राथमिक औषधोपचार देण्यात आले व पुढील मार्गदर्शन करण्यात आले.

महानगरपालिकेच्या या व्यापक मोहिमेमुळे शहरात कुष्ठरोगाविषयी जनजागृती वाढली असून लक्षणे असलेल्या अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने तपासणी केली. वैद्यकीय विभागातर्फे मोहिमेदरम्यान समुपदेशन, उपचार, मार्गदर्शन आणि फॉलो-अप यावरही विशेष भर देण्यात आला. शहराच्या आरोग्य रक्षणासाठी महानगरपालिका सतत प्रयत्नशील असून अशा उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande