
परभणी, 5 डिसेंबर (हिं.स.)।
पूर्णा-झिरोफाटा रस्त्यावर एका पादचार्यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी पूर्णा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संतोष उर्फ छगन घोडसकर (वय 28, रा. कंधार, जिल्हा नांदेड) हे सकाळी साडेसातच्या सुमारास देगाव परिसरात पायी जात असतांना पाठीमागून भरधाव वेगात येणार्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये घोडसकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस जमादार अमर चाऊस यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपास सुरू असून अज्ञात वाहनाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis