पंढरपूर बसस्थानक आगार घाणीच्या विळख्यात
सोलापूर, 5 डिसेंबर (हिं.स.)।राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने पंढरपुरात राज्यातील सर्वात मोठे बसस्थानक बांधले. परंतु या बसस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. भाविकांना, प्रवाशांना सेवा-सुविधा मिळत नाहीत. यामुळे त
पंढरपूर बसस्थानक आगार घाणीच्या विळख्यात


सोलापूर, 5 डिसेंबर (हिं.स.)।राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने पंढरपुरात राज्यातील सर्वात मोठे बसस्थानक बांधले. परंतु या बसस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. भाविकांना, प्रवाशांना सेवा-सुविधा मिळत नाहीत. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. असे असतानाही या बसस्थानकाकडे मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

नुकतीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर येथील बसस्थानकास भेट दिली होती. यावेळी त्यांना घाणीचे साम्राज्य दिसून आले. प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याचे आढळून आले.यामुळे त्यांनी आगार प्रमुखांना स्वच्छता ठेवा व प्रवाशांना सुविधा द्या, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, याकडे आगार प्रमुखांनी दुर्लक्ष केले. याची गंभीर दखल घेऊन प्रताप सरनाईक यांनी आगार प्रमुखास निलंबित केले आहे. या घटनेमुळे राज्य परिवहन महामंडळामध्ये खळबळ उडाली आहे.

पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे याठिकाणी राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्वात मोठे 28 प्लॅटफॉर्म असलेले बसस्थानक बांधले आहे. याठिकाणी दररोज एसटीच्या सुमारे 300 ते 400 फेऱ्या होतात. तसेच 30 हजारांहून अधिक भाविक पंढरपुरात दर्शनासाठी येतात. यामुळे याठिकाणी बसस्थानकात स्वच्छता व भाविकांना, प्रवाशांना सुविधा मिळणे गरजेचे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande