
अमरावती, 5 डिसेंबर (हिं.स.)
आर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीयांना मनरेगा योजनेतील कथित अपहार प्रकरणात अटक करण्यात आल्याने या घटनेच्या निषेधार्थ गुरुवार आणि शुक्रवारी दोन दिवस राजपत्रित अधिकाऱ्यांनी सामूहीक रजा आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे या घटनेचा गुरुवारी निषेध व्यक्त करीत निवेदन देण्यात आले.केवळ कंत्राटी कर्मचाऱ्याच्या जबाबांवर आणि व्यवहारात वापरलेल्या डीएससी चाउल्लेख या एकाच आधारावर गटविकास अधिकाऱ्यांना अटक करणे ही कायदेशीर वप्रक्रियात्मकदृष्ट्या चुकीची कारवाई आहे. महिला अधिकारी असूनहीआवश्यक ती सावधगिरी आणि प्राथमिक विभागीय चौकशी न करता अटक केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकाससेवाराजपत्रित अधिकारी संघटनेच्या नेतृत्वात अतिरिक्त सीईओंसह प्रकल्पसंचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वजिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी रोष व्यक्त करीत दोन दिवस सामूहिक रजा आंदोलन केले. याबाबत संघटनेने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. या प्रकारामुळे राज्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांमध्ये गंभीर असुरक्षितता निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद आहे. आंदोलनात अतिरिक्त सीईओ विनय ठमके, प्रकल्प अधिकारी प्रिती देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, बालासाहेब अन बायस, बाळासाहेब रायबोले, बिडीओ सुदर्शन तुपे, तुषार दांडगे, विनोद खेडकर, योगेशवानखडे, संजय खारकर सर्वच पंचायत समितीचे अधिकारी सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी