पुण्यातील आयुष रुग्णालयाला मोठी पसंती
पुणे, 5 डिसेंबर (हिं.स.)। औंध जिल्हा रुग्णालय परिसरातील आयुष रुग्णालय सुरू होऊन दीड वर्ष पूर्ण होत असताना उपचारांची मागणी सातत्याने वाढत आहे. मार्च 2024 पासून कार्यरत असलेल्या या 30 बेडेड रुग्णालयात आयुर्वेदातील पंचकर्मसारखे उपचार मोफत मिळत आहेत. य
पुण्यातील आयुष रुग्णालयाला मोठी पसंती


पुणे, 5 डिसेंबर (हिं.स.)। औंध जिल्हा रुग्णालय परिसरातील आयुष रुग्णालय सुरू होऊन दीड वर्ष पूर्ण होत असताना उपचारांची मागणी सातत्याने वाढत आहे. मार्च 2024 पासून कार्यरत असलेल्या या 30 बेडेड रुग्णालयात आयुर्वेदातील पंचकर्मसारखे उपचार मोफत मिळत आहेत. योग, नॅचरोपथी, युनानी आणि होमिओपथी उपचार एकाच छताखाली निशुक्ल उपलब्ध आहेत. दररोज सरासरी 130 ते 140 रुग्ण उपचारासाठी येत आहेत.

फेबुवारी 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत बाह्यरुग्ण विभागात 48,372 रुग्णांनी उपचार घेतले आहेत, तर 6879 नागरिकांनी पंचकर्म प्रक्रिया करून घेतली आहे.रुग्णालयात नियमित योगा सत्रांसह ऋतुनुसार पंचकर्मासह इतर आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि युनानी उपचार केले जातात. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आहार-विहार मार्गदर्शनही केले जाते.

रुग्णालयात सध्या योगा, आयुष, होमिओपॅथी, युनानी, नॅचरोपथी उपचार उपलब्ध आहेत. ओपीडी सकाळी 10 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 4 ते 6 या वेळेत चालते. आंतररुग्ण सुविधाही उपलब्ध आहे. प्रत्येक रुग्णाची डॉक्टरांकडून सखोल तपासणी केली जाते. निदानानुसार उपचारांची दिशा ठरवली जाते, तसेच प्रतिबंधात्मक उपचारही केले जातात. मधुमेह व रक्तदाबाच्या गुंतागुंती कमी करण्यासाठीही विशेष उपचार पद्धती वापरली जाते. उपचारांना नागरिकांकडून प्रतिसादही चांगला आहे. येथे सर्व सेवा पूर्णपणे निशुल्क आहेत. त्याचा जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande