पुण्यात १२५० कोटींच्या कामांचा धडाका; आचारसंहितेपूर्वी होणार लोकार्पण
पुणे, 5 डिसेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे; पण आता महापालिका प्रशासनाचीही लगबग सुरू झाली आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महापालिकेच्या सुमारे १२४९ कोटी रुपयांच्
PMC news


पुणे, 5 डिसेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे; पण आता महापालिका प्रशासनाचीही लगबग सुरू झाली आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महापालिकेच्या सुमारे १२४९ कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचा धडाका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होण्याची शक्यता आहे.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी यासंदर्भात बैठका घेऊन कामाचा आढावा घेतला. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षित प्रभाग अंतिम झाले आहेत. पुढील दोन आठवड्यांत मतदारयादीही अंतिम होणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठीची तयारी बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होतील, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या निवडणुका आधी होतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये महापालिका निवडणुकीचा आचारसंहिता डिसेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जाहीर होऊ शकते अशी चर्चा राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.

बिंदू माधव चौकातील उड्डाणपूल आणि समतल विलगक आणि आचार्य आनंद ऋषीजी महाराज चौक (पुणे विद्यापीठ चौक) येथील उड्डाणपूल व समतल विलगक या १५० कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. शेवाळवाडी येथील पाणी पुरवठा प्रकल्प ३५ कोटी, मुंढवा केशवनगर टाक्या आणि जलवाहिनीच्या कामाची सुरुवात २७ कोटींचे, अमृत २ योजनेतून वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचे २०० कोटी रुपयांचे काम होणार आहे. असे एकूण ४१३ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande