पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल
पुणे, 5 डिसेंबर (हिं.स.)।पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असणारी ३२(१)ची परवानगी राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी वाटाघाटी करून भूसंपादनाचा दर निश्चित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्
Pune Air port


पुणे, 5 डिसेंबर (हिं.स.)।पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असणारी ३२(१)ची परवानगी राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी वाटाघाटी करून भूसंपादनाचा दर निश्चित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, दरनिश्‍चितीसाठी येत्या सोमवारी शेतकरी आणि जिल्हा प्रशासन यांच्या बैठक होणार असून, संपादनाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे पडले असल्याचे मानले जात आहे. पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनासाठी आवश्‍यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत.

भूसंपादनापोटी द्यावयाच्या मोबदल्याच्या रकमेचा तपशील असलेला अहवाल ११ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. हा अहवाल राज्य सरकारने मान्य करून तो उद्योग विभागाकडे पाठविला. या अहवालाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायद्यातील ३२ (१) कलमानुसार उद्योग विभागाची मान्यता मिळणे आवश्‍यक असते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande