सोलापूर : रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी प्रहारचे अनोखे रक्तदान आंदोलन
सोलापूर, 5 डिसेंबर (हिं.स.)।माढा तालुक्यातील उंदरगाव ते केवड गावाला जोडणाऱ्या पुलाजवळील केवड येथील भैरवनाथ मंदिरासमोरील रस्ता दुरुस्तीसाठी करण्याच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात सकाळी दहा वाजता रक्तदान आंदोलन केले. यावेळी ३३ जणा
सोलापूर : रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी प्रहारचे अनोखे रक्तदान आंदोलन


सोलापूर, 5 डिसेंबर (हिं.स.)।माढा तालुक्यातील उंदरगाव ते केवड गावाला जोडणाऱ्या पुलाजवळील केवड येथील भैरवनाथ मंदिरासमोरील रस्ता दुरुस्तीसाठी करण्याच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात सकाळी दहा वाजता रक्तदान आंदोलन केले. यावेळी ३३ जणांनी रक्तदान केले. रस्ता दुरूस्तीच्या मागणीसाठी प्रहारने अनोखे आंदोलन केले. याबाबत संघटनेने तहसीलदार संजय भोसले व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुनील हेळकर यांना निवेदन दिले होते. माढा तालुका व परिसरातील सर्व कारखान्यांमुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तालुक्यातील उंदरगाव ते केवड गावाला जोडणारा पूल तसेच केवड गावाजवळील भैरवनाथ मंदिरासमोरील रस्ता प्रचंड खराब झाला आहे.त्या ठिकाणी २ ते ३ फुट खोल खड्डे पडलेले आहेत. उसाच्या वाहने जाणे त्या रस्त्यावरून अशक्य झाले आहे. या रस्त्याने शाळकरी मुले ही ये जा करत असतात. येथे बऱ्याच उसाने भरलेल्या ट्रॉली पडल्या आहेत. केवड ते जामगाव रस्ताही दुरूस्त करण्याची गरज आहे‌. आठ दिवसांत रस्ता दुरुस्ती नाही झाली तर रस्ता मशीनने खोदून पूर्ण वाहतूक बंद करण्याचा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande