बीड जिल्ह्यातील गेवराईच्या बाजारातून शेवगा झाला गायब
बीड, 5 डिसेंबर, (हिं.स.)। गेवराई तालुक्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिवाळा व उन्हाळ्यात चांगला मिळतो या आशेवर शेतकऱ्यांनी लावलेल्या शेवगा पिकाचेही मोठे नुकसान झाले असल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामु
बीड जिल्ह्यातील गेवराईच्या बाजारातून शेवगा झाला गायब


बीड, 5 डिसेंबर, (हिं.स.)। गेवराई तालुक्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिवाळा व उन्हाळ्यात चांगला मिळतो या आशेवर शेतकऱ्यांनी लावलेल्या शेवगा पिकाचेही मोठे नुकसान झाले असल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे.

त्यामुळे शेवग्याची आवक गेवराईच्या बाजारात घटली असल्याने आठवडी बाजार व भाजीमंडईतून शेवगा गायब झाला आहे.

शेवगा हा रोजच्या जेवणातील महत्वाचा घटक असून पौष्टिक, औषधी व आरोग्यवर्धक गुणधर्मांमुळे त्याला बाजारात कायम मागणी असते. मात्र यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी,

कीडरोगाच्या प्रादूर्भावामुळे शेवग्याच्या बागेचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. ग्रामीण भागातून आता शेवगा येणे पूर्णपणे बंद झाले आहे.

आठवडभरात क्वचितच एखादा कॅरेट मिळतो. मागणी जास्त असल्याने दर आपो-आप वाढत चालले आहेत. शेतकरी वर्गातही चिंता वाढली असून उत्पादन पुन्हा सुरळीत होण्यासाठी हंगामी स्थिती सुधारण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पुढील महिन्यात वातावरण स्थिर राहिल्यास बाजारात शेवग्याचा पुरवठा वाढेल आणि दर काही प्रमाणात कमी होती, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande