थंडी वाढली आणि बाजरी देखील महाग झाली
छत्रपती संभाजीनगर, 5 डिसेंबर (हिं.स.)। थंडीची चाहूल लागताच बाजारात बाजरीला मोठी मागणी वाढली आहे. यंदा सततच्या पावसामुळे बाजरी आणि ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे दरातही वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बाजरीचे दर क्विंटलमा
थंडी वाढली आणि बाजरी देखील महाग झाली


छत्रपती संभाजीनगर, 5 डिसेंबर (हिं.स.)। थंडीची चाहूल लागताच बाजारात बाजरीला मोठी मागणी वाढली आहे. यंदा सततच्या पावसामुळे बाजरी आणि ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे दरातही वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बाजरीचे दर क्विंटलमागे ६०० ते ८०० रुपयांनी वाढले आहेत. किलोमागे सहा ते आठ रुपयांची वाढ झाली आहे.

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजरीच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. बाजारात चांगल्या प्रतीच्या मालाची आवक केवळ ३० टक्के आहे. उर्वरित ७० टक्के माल हलक्या व काळवट प्रतीचा आहे. त्यामुळे चांगल्या मालाला अधिक मागणी आहे. सध्या थंडी वाढताच बाजरीही महागली असून किलोमागे ६ ते ८ रुपयांची दरवाढ झाली आहे.

सततच्या पावसामुळे बाजरी, ज्वारीचे नुकसान झाले. थंडीमुळे मागणी वाढली आहे. बाजरी ज्वारीची आवक कमी झाली. हवामान बदलामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.

बाजारात दररोज १० ते २० टन बाजरी आणि ज्वारीची आवक होत आहे. बाजरीमध्ये उष्णता देणारे घटक असतात. थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीराला ऊब मिळते. थंडीचा परिणाम कमी होतो. बाजरीमध्ये पोषणमूल्ये आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांत बाजरीची मागणी अधिक असते. व्यापाऱ्यांनी यंदा दर तेजीत राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande