अमरावती - विद्यापीठाच्या ज्युनियर हॅकेथॉन मध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला पंख - कुलगुरू
अमरावती, 5 डिसेंबर (हिं.स.) शालेय वयातच विद्याथ्र्यांनी कल्पनाशक्तीपलिकडे तयार केलेल्या विविध विषयांवरील संशोधन मॉडेल्स पाहून विद्याथ्र्यांच्या कल्पनांना पंख फुटले असा एकंदरीत सूर प्रदर्शनीमधील मॉडेल्स पाहून निघाला. त्यामुळे शालेय विद्यार्थी भविष्
विद्यापीठाच्या ज्युनियर हॅकेथॉन-2025 मध्ये विध्यार्थ्यांचा कल्पकतेला पंख-कुलगुरू शालेय विध्यार्थ्यांचा भरभरुन प्रतिसाद


अमरावती, 5 डिसेंबर (हिं.स.)

शालेय वयातच विद्याथ्र्यांनी कल्पनाशक्तीपलिकडे तयार केलेल्या विविध विषयांवरील संशोधन मॉडेल्स पाहून विद्याथ्र्यांच्या कल्पनांना पंख फुटले असा एकंदरीत सूर प्रदर्शनीमधील मॉडेल्स पाहून निघाला. त्यामुळे शालेय विद्यार्थी भविष्यात निश्चितच उंच भरारी घेतील, हे निश्चित. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पुढाकारातून शालेय विद्याथ्र्यांसाठी ‘ज्युनियर हॅकेथॉन-2025’ चे आयोजन करण्यात आले. इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्याथ्र्यांनी या स्पर्धेला भरभरुन प्रतिसाद देत आपापल्या कल्पनांनी तयार केलेली विविध विषयांवरील संशोधन मॉडेल्स यावेळी सादर करण्यात आलीत. प्रदर्शनीचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते झाले. यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. सौम्या शर्मा (चांडक) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, डॉ. सौम्या शर्मा (चांडक) यांनी विद्याथ्र्यांनी सादर केलेली संशोधन मॉडेल्स पाहून विद्याथ्र्यांशी संवाद साधला व त्यांच्या मॉडेल्सची माहिती जाणून घेतली. विद्याथ्र्यांनी सुध्दा संशोधन मॉडेल्स कशी आणि किती फायदेशीर आहेत, त्यांच्या मॉडेल्सचे उपयोग यावेळी मान्यवरांना सांगितले. विद्यापीठ अंतर्गत असलेल्या इन्क्युबेशन सेंटर व मेधावाटिका स्टार्टअप यांच्या संयुक्त विद्यमाने ही ज्युनियर हॅकेथॉन-2025 स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यासाठी टेक्नॉलॉजी अॅन्ड डिजिटल इन्नोव्हेशन, एन्व्हार्यमेंट अॅन्ड सस्टेनबिलिटी, हेल्थ अॅन्ड बेलबिइंग, ओपन थिम असे विषय ठेवण्यात आले होते. इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्याथ्र्यांनी तयार केलेली विविध विषयांवरील मॉडेल्स सादर केलीत. यावेळी इन्क्युबेशन सेंटरच्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद यादव, इन्क्युबेशन सेंटरचे सर्व अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

अमरावतीत आय.टी. पार्क व्हावा-आयुक्त या कार्यक्रमारम्यान शहराच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्वाची चर्चा झाली. मनपा आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांनी अमरावतीत आय.टी. पार्क काळाची गरज असल्याचे सांगून शालेय जीवनातच विद्याथ्र्यांना प्रगल्भ बनविणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात ते आपले उज्ज्वल जीवन घडवू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सुध्दा आय.टी. पार्कसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून शासनाकडे सुध्दा याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे सांगितले. कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, सेंटरच्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर यांनीही यावेळी मनपा आयुक्त यांना उपक्रमांबाबतची माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande