तामलवाडी एमआयडीसीचे काम रखडले
सोलापूर, 5 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर-तुळजापूर महामार्गालगत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी हद्दीत नव्याने एमआयडीसीला मान्यता मिळाली. परंतु गेल्या सहा महिन्यापासून एमआयडीसीचे काम रखडले आहे. शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध सुरू केला आहे. आतापर्यंत केवळ 5
तामलवाडी एमआयडीसीचे काम रखडले


सोलापूर, 5 डिसेंबर (हिं.स.)।

सोलापूर-तुळजापूर महामार्गालगत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी हद्दीत नव्याने एमआयडीसीला मान्यता मिळाली. परंतु गेल्या सहा महिन्यापासून एमआयडीसीचे काम रखडले आहे. शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध सुरू केला आहे. आतापर्यंत केवळ 57 हेक्टर जमिनीची मोजणी झाली आहे. त्यामुळे उद्योजकांनी या एमआयडीसीकडे पाठ फिरवली आहे.धाराशिव जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी व येथील युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी तामलवाडी येथे एमआयडीसी स्थापन करण्याची मागणी केली होती. सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील कटारे स्पिनींग मिलच्या पाठीमागे एमआयडीसीसाठी जागा मंजूर झाली.सुमारे 146 हेक्टर जमिनीवर ही एमआयडीसी उभारण्याचे काम सुरू झाले. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून एमआयडीसीचे काम रखडले आहे. येथील शेतकऱ्यांनी आता भूसंपादनाला विरोध सुरु केला आहे. शेतकऱ्यांनी जमिनीची मोजणी देखील होऊ दिली नाही. दुसरीकडे ज्यांनी जमिनी दिली आहे अशा 57 हेक्टर जमिनीची मोजणी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande