लातूर जिल्हा कारागृहात जनजागृती शिबिर संपन्न
लातूर, 6 डिसेंबर (हिं.स.)। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत लातूर कारागृहात जनजागृती शिबीर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या किमान समान कार्यक्रमानुसार एड्स या आजाराबाबत जनजागृतीसाठी लातूर कारागृह येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर
लातूर जिल्हा कारागृहात  जनजागृती शिबिर संपन्न


लातूर, 6 डिसेंबर (हिं.स.)।

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत लातूर कारागृहात जनजागृती शिबीर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या किमान समान कार्यक्रमानुसार एड्स या आजाराबाबत जनजागृतीसाठी लातूर कारागृह येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर जिल्हा न्यायालय व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे व्यंकटेश गिरवलकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे समुपदेशक तानाजी भोसले, उडाण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रमोद सोमवंशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे श्री. ढोपरे यांनी मार्गदर्शन केले. कारागृह अधीक्षक श्री. मुलाणी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री. गिरवलकर यांनी एड्स आजाराबाबत कैद्यांना एचआयव्ही, एड्स म्हणजे काय, या आजार कसा पसरतो व त्याची लक्षणे काय आहेत, याबाबत माहिती दिली. एड्सबाबत असलेली उपचार पध्दतीबाबत तसेच सदरील आजारास प्रतिबंध कसे करता येईल, याबाबत कैद्यांना मार्गदर्शन केले

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande