
छत्रपती संभाजीनगर, 6 डिसेंबर, (हिं.स.)। हिंदू समाजाच्या अभिमानाचा,साहसाचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक असलेल्या हिंदू शौर्य दिवसानिमित्त आज शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संभाजीनगर येथील सुपारी हनुमान मंदिर येथे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महाआरती केली.
याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते सुभाष पाटील, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, अनिल चोरडिया, महानगरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, महिला आघाडी संपर्क संघटिका सुनीता आऊलवार, सुनीता देव, अनिता मंत्री, दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले व शहर संघटक सुनीता सोनवणे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis