अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा; हिंदुत्वावादी संघटनांची मागणी
अमरावती, 6 डिसेंबर (हिं.स.) ‘लव्ह जिहाद’ हे केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध, वैचारिक युद्ध आहे. यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतरण, लैंगिक शोषण, वेश्या व्यवसाय , निर्घृण हत्या , मानव तस्करी आणि विक्
अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा! हिंदुत्वावादी संघटनांची मागणी


अमरावती, 6 डिसेंबर (हिं.स.)

‘लव्ह जिहाद’ हे केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध, वैचारिक युद्ध आहे. यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतरण, लैंगिक शोषण, वेश्या व्यवसाय , निर्घृण हत्या , मानव तस्करी आणि विक्री, दहशतवादी कारवायात सहभाग इथपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो. हे विविध माध्यमातून अनेकदा उघड झाले आहे. आजवर राज्यात सहस्रावधी महिला आणि युवती लव्ह जिहादची शिकार झाल्या आहेत. त्यामुळे हिंदू महिलांच्या रक्षणासाठी राज्यात येत्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा, अशी मागणी अमरावती येथील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अमरावती निवासी जिल्हाधिकार्‍यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी विविध संघटनांचे अनेक अमरावतीकर धर्मप्रेमी उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या काळात अमरावती येथील नागरिकांनी कायद्याच्या मागणीच्या समर्थनार्थ स्वाक्षरी अभियान राबवले. त्या माध्यमातून मिळालेल्या तीन सहस्रांहून अधिक स्वाक्षर्‍या या वेळी निवेदनासमवेत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आल्या. यावेळी रणरागिनी शाखेच्या अर्चना मावळे, शिवसेना महिला शहराध्यक्ष वृंदा मुक्तेवार, निराली होले, पिंकी घटोरिया, पल्लवी कावरे, वेदांती दातीर, भारती यादव तसेच राष्ट्रीय बजरंग दल व शिव प्रतिष्ठान युवा संघटनचे अभिषेक दीक्षित, आरएसएसचे राम देशमुख, मानवाधिकारचे पंकज बारबुद्धे, पंकज गायकवाड, सुराज्य अभियानचे सिद्धार्थ चौकसे, गडगडेश्वर मंदिचे महेंद्र वर्मा, डॉ. दिनेश पाटील, वर्मा, हिंदू जनजागृती समितीतर्फे श्रीकांत पिसोळकर, प्रदीप गर्गे, गिरीश जामोदे, रोशन मुळे, सनातन संस्थेतर्फे गिरीश कोमेरवार. गजानन सोनटक्के, डॉ. रमेश वरूडकर इत्यादी धर्मप्रेमी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande