
लातूर, 6 डिसेंबर, (हिं.स.)। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न युग पुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी लातूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्क येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी भदंते पयानंद, भदंते बोदिराज, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके कोंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अँड किरण जाधव,जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज सिरसाठ माजी उपनगराध्यक्ष मोहन माने, चंद्रकांत चिकटे,जिल्हा बँकेचे संचालक अशोक गोविन्दपुरकर, अँड बाबासाहेब गायकवाड ,प्रवीण कांबळे,कैलास कांबळे शिवाजी कांबळे, नागसेन कामेगावकर ,अशोक कांबळे, इम्रान सय्यद अँड देविदास बोरुळे यांच्यासह मान्यवर, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis