नाराज प्रशांत जगताप शरद पवारांच्या भेटीला
पुणे, 6 डिसेंबर (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक समीकरणांनुसार निवडणूक लढवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे राज्यात सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये ठिकठिकाणी युती-आघाडी झाल्याचे चित्र
नाराज प्रशांत जगताप शरद पवारांच्या भेटीला


पुणे, 6 डिसेंबर (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक समीकरणांनुसार निवडणूक लढवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे राज्यात सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये ठिकठिकाणी युती-आघाडी झाल्याचे चित्र होते. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही त्याला अपवाद ठरली नाही. त्यात शरद पवारांनी भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याने पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कोणी राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतेला कडाडून विरोध केला.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजीनामा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शनिवारी पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande