हैदराबाद-एलटीटी विशेष गाडी नांदेड व छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणार
परभणी, 6 डिसेंबर (हिं.स.)। प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे हैदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस-हैदराबाद या मार्गावर विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही विशेष सेवा नांदेड व छत्रपत
हैदराबाद-एलटीटी विशेष गाडी नांदेड व छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणार


परभणी, 6 डिसेंबर (हिं.स.)।

प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे हैदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस-हैदराबाद या मार्गावर विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही विशेष सेवा नांदेड व छत्रपती संभाजीनगर मार्गे संचलित केली जाणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी दिलेल्या दिनांकांना एक फेरी पूर्ण करेल. गाडी क्रमांक 07150 हैदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस ही विशेष गाडी शनिवार दि. 06 डिसेंबर रोजी सुटेल, तर गाडी क्रमांक 07151 लोकमान्य टिळक टर्मिनस-हैदराबाद ही गाडी रविवार 07 डिसेंबर रोजी प्रस्थान करेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे वाढत्या प्रवासी संख्येला दिलासा मिळणार असून या मार्गावरील गर्दीही कमी होण्यास मदत होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande