पुणे - आचारसंहितेच्या धास्तीने निविदा मंजुरीसाठी धडपड
पुणे, 6 डिसेंबर, (हिं.स.)। डिसेंबर महिन्यात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पटापट निविदा मंजूर करून घेण्याची धडपड सुरु झाली आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे ४०० कोटी रुपयांचे
PMC news


पुणे, 6 डिसेंबर, (हिं.स.)। डिसेंबर महिन्यात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पटापट निविदा मंजूर करून घेण्याची धडपड सुरु झाली आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे ४०० कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यामध्ये कचरा वाहतुकीसाठी पाच वर्षासाठी ३४० घंटागाड्या घेतल्या जाणार असून, त्यासाठी तब्बल २८० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर होईल असे यापूर्वी सांगितले जात होते. त्यामुळे या निवडणुका या जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होतील असा अंदाज वर्तविला जात होता.

मात्र, आता गेल्या चारपाच दिवसांपासून नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेऐवजी महापालिकांच्या निवडणुका घेतल्या जाणार असल्याची चर्चा राजकीय कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहेच, पण त्याचे संकेतही प्रशासनाकडून दिले जात आहेत. पुण्यासह राज्‍यातील २९ महापालिकांची निवडणुकीची आचारसंहिता ही डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लागू शकते असे सांगितले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande