
पुणे, 6 डिसेंबर (हिं.स.)। पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाचा दर निश्चित करण्यासंदर्भात सोमवारी बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी शेतकऱ्यांबरोबर चर्चा करतील.
पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असून, भूसंपादनापोटी द्यावयाच्या मोबदल्याच्या रकमेचा तपशील असलेला अहवाल ११ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. राज्य शासनाने त्याला मंजुरी दिल्यानंतर उद्योग विभागानेही ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायद्यातील ३२ (१) कलमानुसार मंजुरी दिली. त्यामुळे प्रत्यक्ष भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला. उद्योग विभागाची मान्यता मिळाल्याने आता जमिनीच्या दरासंदर्भात शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु