
अमरावती, 6 डिसेंबर, (हिं.स.)
सचिवाच्या चमूने प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालय चिखलदरा, प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंभ, ग्रामीण रुग्णालय चुरणी तसेच महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिवांनी बिहाली अंगणवाडी केंद्र डोमा, जरिदा राहू, हतरू,कुलंगणा खुर्द येथे भेटी दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र टेब्रुसोंडा, सेमाडोह तर धारणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये भेटी देऊन विविध विभागाची पाहणी केली. कुपोषण व बालमृत्यूचे कारण समजून घेतले तर आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांची चौकशी केली. या दौर्याने मेळघाटच्या अधिकार्यांमध्ये चांगली धडकी भरली होती. काही अधिकारांवर कारवाईची टांगती तलवार आहे. येणार्या आठ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार असल्याने मेळघाटातील प्रश्न विधानसभेत गाजणार आहेत. सचिवांच्या या दौर्यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव निपुण विनायक, आदिवासी विकास विभाग सचिव विजय वाघमारे, महिला व बालकल्याण विभाग सचिव अनुप कुमार यादव, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह अन्य अधिकार्यांचा समावेश होता. मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू तसेच सॅम व मॅमची माहिती घेतली. आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणार्या आश्रम शाळा व योजनांची स्थिती त्यांनी जाणून घेतली. त्यांना अनेक ठिकाणी अनियमितता सुद्धा दिसून आली.
स्थानिक कर्मचार्यांशी संवाद
अधिकार्यांनी अंगणवाडी सेविका, आशा सेविका व स्थानिक पातळीवर काम करणार्या कर्मचार्यांशी व सामाजिक कार्यकर्त्यांची सुद्धा संवाद साधला व त्यांच्याकडून मेळघाटातील कुपोषण व बालमृत्यूची कारणे समजून घेतली.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी