लातूर - शहरातील मुख्य रस्ते सफाईसाठी पालिकेने सुरू केली विशेष स्वच्छता मोहिम
लातूर, 6 डिसेंबर (हिं.स.) शहरातील सर्व मुख्य रस्त्यावर पडणारा कचरा व रस्त्याच्या साफसफाई ला प्राधान्य देत लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी यांच्या सूचनेनुसार उपायुक्त वसुधा फड यांनी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले असून सदरील मोहिम पुढील २
शहरातील मुख्य रस्ते सफाईसाठी महानगरपालिकेने सुरू केली विशेष स्वच्छता मोहिम


लातूर, 6 डिसेंबर (हिं.स.) शहरातील सर्व मुख्य रस्त्यावर पडणारा कचरा व रस्त्याच्या साफसफाई ला प्राधान्य देत लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी यांच्या सूचनेनुसार उपायुक्त वसुधा फड यांनी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले असून सदरील मोहिम पुढील २ दिवस नियमितपणे सुरू ठेवून शहरातील सर्वच मुख्य रस्ते सफाई व मुख्य रस्त्यावरील डिव्हायडर च्या बाजूची माती काढणे तसेच रस्त्याच्या बाजूचा कचरा साफसफाईचे नियोजन करण्यात आले आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजीव गांधी चौक या भागामध्ये सदर मोहीम राबविण्यात आली असून ज्यामध्ये महानगरपालिकेचे १०० सफाई कर्मचारी एकत्र करून सदर मोहीम राबविण्यात आली. सदरील कामाची पाहणी करण्यासाठी स्वतः उपायुक्त वसुधा फड या सकाळी ६ पासून शहरात फिरत असून त्यांच्या समवेत मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे हे देखील उपस्थित होते. वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करून स्वच्छतेच्या कामाचे नियोजन करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालय बार्शी रोड या मुख्य रस्त्यावर सदरील मोहिमेचे आयोजन करण्यात तेणार आहे. ज्या मध्ये उपायुक्त, मुख्य स्वच्छता अधिकारी, स्वच्छता विभाग प्रमुख, मुख्य स्वच्छता निरीक्षक, सर्व स्वच्छता निरीक्षक, मुकादम, सफाई कामगार, कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टर व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande