पनवेलमध्ये राजकारणाचा नवा सूर — केदार भगत यांची दमदार एन्ट्री
रायगड, 8 डिसेंबर (हिं.स.)। निवडणूक ही लोकसेवेची संविधानिक संधी असली तरी आज ती केवळ पदप्राप्तीपुरती मर्यादित न राहता नेतृत्वक्षमता, जनसंपर्क आणि लोकांचा विश्वास या त्रिसूत्रीची कसोटी ठरत आहे. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक १९ मध्ये अशाच एका नव्या
पनवेलमध्ये राजकारणाचा नवा सूर — केदार भगत यांची दमदार एन्ट्री


रायगड, 8 डिसेंबर (हिं.स.)। निवडणूक ही लोकसेवेची संविधानिक संधी असली तरी आज ती केवळ पदप्राप्तीपुरती मर्यादित न राहता नेतृत्वक्षमता, जनसंपर्क आणि लोकांचा विश्वास या त्रिसूत्रीची कसोटी ठरत आहे. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक १९ मध्ये अशाच एका नव्या राजकीय पर्वाची सुरुवात होत असून भाजप पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

सामाजिक कार्याची आवड, सतत नागरिकांशी संवाद आणि संघटन कौशल्याच्या माध्यमातून केदार भगत यांनी अल्पावधीतच प्रभागात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रभू आळी परिसरात त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस भाई नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, तसेच आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केदार भगत हे संवेदनशील युवा नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. प्रभागातील नागरी समस्या, मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य याबाबत त्यांचा सखोल अभ्यास असून त्या प्रश्नांकडे त्यांनी नेहमीच सकारात्मक आणि कृतीप्रधान दृष्टीकोन ठेवला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे तरुण वर्गात विशेष उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केदार भगत मित्रपरिवाराने राबवलेले सामाजिक उपक्रम लोकांमध्ये विश्वास निर्माण करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १९ मध्ये त्यांचे नाव मजबुतीने चर्चेत असून सक्षम, प्रामाणिक आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. निवडणुकीचा अंतिम कौल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande