
बीड, 8 डिसेंबर (हिं.स.)। पोलीस ठाणे, बीड येथे नोंद असलेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात मा. सत्र न्यायालय, बीड यांनी आरोपीस जामीन मंजूर करून महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. या प्रकरणात आरोपी अमोल बाबूराज तेल्हारकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता तरोध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यात आरोपीस दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत होता.
तपासाच्या प्राथमिक टप्प्यात आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता, कारण त्या वेळी तपास पूर्ण झालेला नव्हता. त्यानंतर पोलीस तपास पूर्ण होऊन चार्जशीट दाखल करण्यात आली, तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीतर्फे ४ डिसेंबर रोजी नियमित जामिन अर्ज मा. सत्र न्यायालय, बीड येथे दाखल करण्यात आला.या जामिन अर्जावर सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने अॅड. योगेश टेकाडे पाटील यांनी अत्यंत सखोल,कायदेशीर आणि वस्तुनिष्ठ युक्तिवाद केला. आरोपीची पुढील कोठडी आवश्यक नाही, कारण तपास पूर्ण झालेला आहे आणि चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे, हे स्पष्टपणे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. अॅड. टेकाडे यांनी युक्तिवादात पुढील महत्वाच्या बावी अधोरेखित केल्या. फिर्याद दाखल करण्यात ४४ दिवसांचा मोठा विलंब आहे, ज्यामुळे फिर्यादी कथनाच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. तसेच वैद्यकीय तपासणी अहवालामध्ये लैंगिक अत्याचाराबाबत कोणताही ठोस निष्कर्ष नसून फल possibility cannot be ruled out असे नमूद आहे.
आरोपी परभणी येथील कायमस्वरूपी रहिवासी असून समाजात त्याचा ठराविक पत्ता आहे, त्यामुळे तो फरार होण्याची शक्यता नाही, तसेच तो न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटी पाळण्यास तयार आहे, हेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. आरोपी १३ सप्टेंबरपासून दीर्घ काळ न्यायालयीन कोठडीत असल्याने, केवळ शिक्षा होण्यापूर्वीच दीर्घ कारावास अन्यायकारक ठरतो, हा मुद्दा देखील प्रभावीपणे मांडण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis