
नांदेड, 8 डिसेंबर (हिं.स.)। धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्यावतीने धर्माबाद पोलीस ठाण्यात स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थांची टेस्ट परीक्षा घेण्यात आली असून यात २१२ विद्यार्थी सहभागी झाले होते. धर्माबाद तालुका व शहरातील अनेक होतकरू, सुशिक्षित युवकांना मार्गदर्शनाची आणि संधीची आवश्यकता होती ही बाब ओळखून पोलीस निरीक्षक भडीकर यांनी हा आगळा वेगळा सामाजिक उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे.
युवकांना रोजगाराच्या संधींसाठी सक्षम करणे, स्पर्धा परीक्षेतील गुणवत्ता वाढवणे, युवकांना चुकीच्या प्रवृत्तींपासून दूर ठेवणे, समाजात सकारात्मक बदल घडविणे असा सकारात्मक उद्देश यात होता विद्यार्थ्यांसाठी मोफत टेस्ट सिरीज तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेत परीक्षेस सामोरे गेले. पोलीस म्हणजे केवळ मारणारा किंवा गुन्हे दाखल करणारा नसून भावी पिढीला दिशा देऊन सक्षम बनवण्याचा मार्ग देखील दाखवू शकतात असे यातुन दिसून आले.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक गणेश कराड, सहायक पोलीस निरीक्षक पगलवाढ, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका पवार मॅडम, पोलीस उपनिरीक्षक मुतेपोड साहेब यांच्या सह सर्वांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis