
बीड, 8 डिसेंबर (हिं.स.)। सध्या रब्बीचा हंगाम सुरू असून शेतकरी आपल्या शेती पिकांना पाणी देत असतात. काही शेतकऱ्यांना सिंचनाचे साधन नसते. त्यामुळे त्यांना बंधारा किंवा नदीच्या पाण्यावर औलंबून रहावे लागत असते. नदीच्या पाण्यावर बंधारा उभारला तर त्याचा फायदा काही दिवस शेतकऱ्यांना होवू शकतो. बोरखडे येथे लोकसहभागातून बंधारा तयार करण्यात आला आहे. सदरील हा बंधारा कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
रब्बी हंगामामध्ये गहु, हरभरा, ज्वारी यासह इतर पिकांची लागवड होते. अनेक शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामातील पिकांना पाणी देण्यास सुरूवात केली. सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना विहिर, बोअर द्वारे पाणी देता येते तर ज्यांना पाणी नाही त्या पिकांना पाण्याअभावी फटका बसतो. नदीवर वाहत्या पाण्यात बंधारा उभारला तर त्याचा फायदा शेती पिकांना होवून जमिनीत पाणी मुरण्यासही मदत होते. बोरखेड येथे लोकसभागातून वनराई बंधारा तयार करण्यात आला. या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा याचा चांगला फायदा होणार आहे.
अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी गजे, कृषी उपसंचालक जाधवर, तालुका कृषी अधिकारी साळी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल कृषी अधिकारी घुमरे यांच्या नियोजनातून बंधारा तयार करण्यात आलेला आहे. यावेळी गावचे उपसरपंच सुनिल अनपट, उपकृषी अधिकारी राजेंद्र राऊत, सहाय्यक कृषी अधिकारी आगलावे, बी पी घुमरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis