अमरावती : घाटे अळीचा हरभरा पिकाला धोका!
अमरावती, 8 डिसेंबर (हिं.स.)। हरभरा पिकाच्या उत्पादनात घट होण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे घाटे अळीचा (हेलिकोव्हरपा) वाढता प्रादुर्भाव आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे हे हवामान या किडीच्या वाढीस विशेषत पौषक ठरत आहे. हरभरा
घाटे अळीचा हरभरा पिकाला धोका! पिकाचे व्यवस्थापन करण्याचा कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला


अमरावती, 8 डिसेंबर (हिं.स.)। हरभरा पिकाच्या उत्पादनात घट होण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे घाटे अळीचा (हेलिकोव्हरपा) वाढता प्रादुर्भाव आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे हे हवामान या किडीच्या वाढीस विशेषत पौषक ठरत आहे. हरभरा पिकावर कळी, फुलोरा आणि घाटे अवस्थेत असताना या किडीचा प्रादुर्भाव अत्यंत नुकसानकारक ठरती, एक अळी तिच्या जीवनचक्रात २५ ते ३० घाटवांना नुकसान करते त्यामुळे काळजी घेऊनया पिकाचे व्यवस्थापन करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कडधान्य शास्त्र विभागाने दिला आहे.

घाटे अळी ही कीड हरभरा, तूर, मसूर, वाटाणा, चवळी यांसारख्या कडधान्यांवर आढळते. तसेच कापूस, सूर्यफूल, टोमॅटो, कोबी यांसारख्या पिकांनाही ती बाधित करते. त्यांची अंडी खसखशीच्या दाण्याप्रमाणे दिसतात; अळ्या १५ ते २० दिवसांत विकसित होतात आणि ३० ते ४० मिमी लांब असतात. नुकसानीचा प्रकार: प्रथम अवस्थेतील अळ्या पानांचे आवरण कुरतडतात, तर पुढील अवस्थेत कळ्या व घाट्यातील दाणे फस्त करतात. दाणे खाल्ल्यामुळे घाटे पूर्णत पोकळ होतात.

वरील उपाययोजनांनंतरही किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास शिफारस केलेले कीटकनाशके आलटून-पालटून वापरावीत. तज्ज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी एकात्मिक कीटक व्यवस्थापन स्वीकारल्यास हरभऱ्याचे उत्पादन घटण्यापासून मोठ्या प्रमाणात बचाव करता येऊ शकतो, अशी माहिती डॉ. प्रज्ञा कदम, कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande