
अमरावती, 8 डिसेंबर (हिं.स.) | नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत निवडणूक पार पडल्यानंतर मतमोजणीपूर्वी सुरक्षिततेसाठी ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूमबाहेर राजकीय हलचाली वाढल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रकाश मारोटकर तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते शाम शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्ट्रॉंग रूमच्या बाहेर तळ ठोकला आहे. रात्रीच्या वेळेसही स्ट्रॉंग रूम परिसरात कार्यकर्ते उपस्थित राहून पहारा देत आहेत.
स्ट्रॉंग रूमची सुरक्षितता, मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक राहावी आणि कोणताही गोंधळ किंवा गैरव्यवहार होऊ नये, यासाठी हा सतर्क पहारा असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले. निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने येणार याची शहरात उत्सुकता असताना राजकीय पक्षांनी स्ट्रॉंग रूम परिसरात उपस्थिती ठेवत सजग भूमिका घेतली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी