अमरावती : महिन्यात बाजार समितीत धान्याची विक्रमी आवक
अमरावती, 8 डिसेंबर (हिं.स.)। स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत २ महिन्यात ५ लाख ८० हजार पोत्यांची विक्रमी आवक झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ४ लाख ९१ हजार ६५७पोत्यांची आवक मक्याची आहे. त्याखालोखाल सोयाबीन, गहू, तूर, ज्वारी आणि हरभऱ्याची आवक आहे. उल्
दोन महिन्यात बाजार समितीत धान्याची विक्रमी आवक


अमरावती, 8 डिसेंबर (हिं.स.)।

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत २ महिन्यात ५ लाख ८० हजार पोत्यांची विक्रमी आवक झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ४ लाख ९१ हजार ६५७पोत्यांची आवक मक्याची आहे. त्याखालोखाल सोयाबीन, गहू, तूर, ज्वारी आणि हरभऱ्याची आवक आहे. उल्लेखनीय म्हणजे सदर आवक ही केवळ २ महिन्यांची आहे. बाजार समितीमध्ये ऑक्टोबर महिन्यापासून मक्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. एकूण ४ लाख ९१ हजार ६५७ पोत्यांची आवक केवळ २ महिन्यांत झाली. १ हजार ५०० रु. प्रति क्विंटल सरासरी भाव मक्याला मिळाला. त्याखालोखाल सोयाबीनचे दर एकरी उत्पन्न घटले. तरीसुद्धा याच कालावधीत ५१ हजार पोते शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणले. सोयाबीनला सरासरी भाव प्रति किंटल ४ हजार रूपये इतका मिळाला. सोयाबीनला शासकीय हमीभाव ५ हजार रुपयापेक्षा जास्त असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन हमीभावावर शासनाला विकली. त्यामुळे तुलनेत बाजारसमितीमध्ये सोयाबीनची आवक कमी झाल्याचे समजते. बाजारात गव्हाचीसुद्धा चांगली आवक राहिली. १५ हजार ५६१ पोते सरासरी भाव २ हजार ५७५, तूर ११ हजार ३०२ पोते सरासरी भाव ६ हजार ५००, हरभरा ३ हजार ४२५ पोते सरासरी भाव ५ हजार १०० प्रति क्विंटल, ज्वारी ५ हजार ५०८ पोते सरासरी भाव १ हजार ५०० रु. प्रति क्विंटल याप्रमाणे आवक झाली असून याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande