
नागपूर, 8 डिसेंबर (हिं.स.) - विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त दोन्ही सभागृहांच्या (विधानसभा - विधानपरिषद) कामकाजास वंदे मातरम या राष्ट्रगीताने व जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताने सुरूवात झाली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रीगण यांच्यासह सभागृहांचे सदस्य उपस्थित होते. यावेळी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या 'वंदे मातरम' या गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सभागृहात 'वंदे मातरम' गीताचे संपूर्ण गायन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी