
नागपूर, 8 डिसेंबर (हिं.स.) - विधानसभेच्या तालिका सभापतींची नावे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी, तर विधान परिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात जाहीर केली.
विधानसभेच्या तालिका सभापतीपदी विधानसभा सदस्य सर्वश्री चैनसुख संचेती, किशोर आप्पा पाटील, श्रीमती सरोज अहिरे, डॉ. राहुल पाटील, उत्तमराव जानकर, रामदास मसराम, समीर कुणावार यांची नामनियुक्ती करण्यात आली आहे.
तालिका सभापती म्हणून सदस्य सर्वश्री अमित गोरखे, कृपाल तुमाने, अमोल मिटकरी, धीरज लिंगाडे आणि सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सभापती प्रा. शिंदे यांनी जाहीर केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी