छत्रपती संभाजीनगर, 30 सप्टेंबर (हिं.स.)।
मराठी तरुणांनी शेती संलग्न क्षेत्राच्या व्यवसायात अधिकाधिक सहभागी झाले पाहिजे, शेती संलग्न क्षेत्रात अधिक संधी आहेत असे मत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. मराठी तरुणांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता व्यवसायात अधिकाधिक उन्नती करावी असे आवाहन देखील त्यांनी केलेपैठण तालुक्यातील आडुळ येथे मुळे यांनी सुरू केलेल्या कपिल अँग्रो त्यांनी भेट दिली
संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आडुळ येथे आज नकुल मुळे, सौरभ पिवळ, अभिषेक पिवळ व राहुल मुळे यांनी सुरू केलेल्या कपिल अँग्रो सर्व्हिसेसचे उद्घाटन माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते संपन्न झाले.
मराठी तरुणांनी शेती संलग्न क्षेत्राच्या व्यवसायात मोठ्या कष्टाने पडले असून त्यांचा हा प्रयत्न सहल होवो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे, युवासेना जिल्हा युवाधिकारी शुभम पिवळ, विलास पाटिल निर्मळ, गणपतराव माने, गोविंद शिंदे, भाऊसाहेब पिवळ, कुंडलिक आगलावे व नरहरी पाटील उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis