छत्रपती संभाजीनगर, 30 सप्टेंबर (हिं.स.)।
सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपल्या परंपरेला जोडून समाजात ऐक्य आणि उत्साहाचा संदेश पसरवणे हेच आपले ध्येय आहे. सर्वांनी उत्साहात सामील झाले पाहिजे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे ज्यष्ठ नेते खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केले आहे
छत्रपती संभाजी नगर येथील एका कार्यक्रमात बोलताना खासदार कराड यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचा उल्लेख केला
छत्रपती संभाजी नगर
भारतीय जनता पार्टीतर्फे वंदे मातरम् रास-दांडिया कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
उल्कानगरी येथे दुर्गा मातेची आरती खासदार भागवत कराड यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमात उपस्थित लोकांचा उत्साह आणि सहभाग मनोहर होता, ज्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis