लातूर, 30 सप्टेंबर (हिं.स.)।
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांच्या पाठपुराव्यानंतर
अतिवृष्टीने अडथळलेला मौजे पेठ येथील प्रवाह, पुन्हा मार्गी लागला आहे.अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना अजून या बंधाऱ्यामुळे साचलेले पाणी राहिल्यासहील्या पिकाचे पूर्ण नुकसान करेल या भावनेतून पाहणी दौऱ्यासाठी भाजप नेत्या अर्चना पाटील चाकूरकर गेलेल्या असताना तेथील शेतकऱ्यांनी याबाबत विनंती केली होती,
अपत्कालीन परिस्थितीत वेळेवर उपाय करण्यात आल्यामुळे परिसरातील शेतकरी किमान या समस्येतून तरी नक्कीच सुटला आहे.
मौजे पेठ येथील कोल्हापूर बंधारा दिनांक झालेल्या तीव्र अतिवृष्टीमुळेओसंडून वाहिला. या वेळी परिसरातील जमा झालेला कचरा, तोडलेली लाकडे, झाडे इत्यादी बंधाऱ्यात अडकल्यामुळे पाण्याचा प्रवाह बंदरातून पुढे जाऊ शकला नाही आणि त्याचा परिणाम म्हणून पाणी शेतकऱ्यांच्या शेतात साचले.
या परिस्थिती बाबत च्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली असता त्यांनी तात्काळ कारवाई करत पाण्याच्या प्रवाहातील सर्व अडथळे दूर केले. यामुळे आता बंधाऱ्याच्या पाण्याचा निचरा होऊन शेतातील पाणी ओढले जाऊ लागले आहे.
शेतकऱ्यांनी देखील अधिकारी आणि प्रशासनाची प्रशंसा करत पुढील खबरदारी घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis