चंद्रपूर : मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर
चंद्रपूर, 30 सप्टेंबर, (हिं.स.) - चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर नुकतेच मनपा राणी हिराई सभागृहात आयोजित करण्यात आले. या शिबिरात सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना, कर्मचारी राज्य विमा महामंडळा
चंद्रपूर : मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर


चंद्रपूर, 30 सप्टेंबर, (हिं.स.) - चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर नुकतेच मनपा राणी हिराई सभागृहात आयोजित करण्यात आले. या शिबिरात सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना, कर्मचारी राज्य विमा महामंडळाची माहिती, कौशल्य विकास व सुरक्षा प्रशिक्षण, आरोग्य सेवा व लसीकरण सुविधा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरात भारत सरकारने 9 ऑगस्ट 2025 रोजी सुरू केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) ची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY), स्वच्छ भारत अभियान, मिशन इंद्रधनुष, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य), बँकांच्या विविध योजना, जल जीवन मिशन अशा केंद्र शासनाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या योजनांची माहितीही देण्यात आली.

या शिबिरामुळे सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय योजनांची थेट माहिती मिळाली तसेच त्यांच्या सामाजिक सुरक्षा, आरोग्य आणि व्यावसायिक प्रगतीबाबत जागरूकता निर्माण झाली. या प्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, स्वच्छता विभाग प्रमुख डॉ. अमोल शेळके, कर्मचारी राज्य विमा महामंडळातर्फे मार्गदर्शन करणारे तृप्ती डोहे, गयानंद सोनटक्के, गणेश गजभिये तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक पंकज बेसारे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande