चंद्रपूर : पीएम स्वनिधी योजने अंतर्गत 7683 पथविक्रेत्यांना मिळाला लाभ
चंद्रपूर, 30 सप्टेंबर (हिं.स.)। प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना ( पीएम स्वनिधी योजना) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाचा लाभ पहिल्या टप्यात एकुण 7683 पथविक्रेत्यांनी घेतला असुन दुसऱ्या टप्यात कर्जाची रक्कम व
चंद्रपूर : पीएम स्वनिधी योजने अंतर्गत 7683 पथविक्रेत्यांना मिळाला लाभ


चंद्रपूर, 30 सप्टेंबर (हिं.स.)। प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना ( पीएम स्वनिधी योजना) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाचा लाभ पहिल्या टप्यात एकुण 7683 पथविक्रेत्यांनी घेतला असुन दुसऱ्या टप्यात कर्जाची रक्कम वाढणार असल्याने नवीन अर्ज भरून कर्जाचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

कोरोना महामारीनंतर देशातील पथ विक्रेत्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने भारत सरकारतर्फे पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू करण्यात आली होती. मूळत: 31 डिसेंबर 2024 रोजी संपणारी ही योजना, केंद्र सरकारने पथ विक्रेत्यांचा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देत 31 मार्च 2030 पर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशातील महानगरपालिका,नगर परिषद यांनी पथ विक्रेत्यांना कर्ज मिळवुन देण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पीएम स्वनिधी योजनेच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत 7683 पथविक्रेत्यांनी 10 हजार रुपयांचा लाभ घेतला होता, यातील 2114 पथविक्रेत्यांनी कर्ज परत करून 20 हजार रुपये कर्ज घेतले तर 349 पथविक्रेत्यांनी 50 हजार रुपयांच्या कर्जाचा लाभ प्राप्त केला आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्यात प्रथम कर्जाची रक्कम 10 हजाराहून वाढून 15 हजार, 20 हजार रुपयांवरून 25 हजार तर तिसरे कर्ज 50 हजार रुपये बँकेकडून मिळणार आहे.

यासाठी अर्ज करण्यास चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दीनदयाळ जन आजीविका अभियान कार्यालय, कस्तुरबा रोड, जिल्हा ग्रंथालयाजवळ, सरकारी दवाखान्याच्या मागे येथे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत लोक कल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. चंद्रपुर शहरातील ज्यास्तीत ज्यास्त पथविक्रेत्यांनी या योजनेच्या लाभ घेऊन आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका आयुक्तांद्वारे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande