छत्रपती संभाजीनगर, 30 सप्टेंबर (हिं.स.) सिल्लोड येथील गावातील धरण फुटले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आणि शेती पिकांच्या वर मोठे संकट उद्भवले
आज भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी या ठिकाणच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.
या घटनेमुळे ग्रामस्थांना झालेल्या हालअपेष्टा, शेती व जनजीवनावर आलेले संकट याची सखोल माहिती घेतली. गावकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या व भावना जाणून घेतल्या. या ठिकाणी तातडीने काय उपाययोजना करता येतील तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कोणत्या शाश्वत योजना राबवता येतील, यावर प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल. असे त्यांनी सांगितले आहे
गावकऱ्यांच्या हिताचे रक्षण हेच आमचे कर्तव्य असून, प्रशासनाला योग्य ते निर्देश देऊन या समस्येवर मार्ग काढण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी ग्रामस्थांना दिला.”
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis