छत्रपती संभाजीनगर, 30 सप्टेंबर (हिं.स.)। धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील मौजे नागुर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत २८ सप्टेंबर रोजी पूराच्या पाण्यात वाहून जाऊन बालाजी व्यंकट मोरे यांचा मृत्यू झाला.
या अनपेक्षित आपत्तीने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या हस्ते मृताच्या कुटुंबीयांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या ४ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
ही रक्कम लवकरच थेट मृताच्या वारसाच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.पूरग्रस्त कुटुंबाच्या डोळ्यांत अश्रू असले तरी शासनाने त्वरित मदत दिल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. गावकऱ्यांनीही प्रशासनाच्या या तातडीच्या प्रतिसादाचे कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis